IndiaReply Logo Indiareply
Sign In Sign Up
  • Home
  • Popular
  • Explore
  • All
    • Loading...

Tell us about your community

i/communityname

Your community description

Info
Install our Android app to unlock all features.
i/Maharashtra
Chat About

Community Information

i/maharashtra

  • malagupta1918

    •

    5 months

    नव्या वर्षासाठी स्वतःसाठी एक जाहीरनामा

    १. स्वतःला आणि इतरांना सारखे सारखे फार सीरियस घेऊ नये. नेहमी कुणालाही सतत सीरियस घेणे वाईट. २. बाबा बुवा संत महात्मे देशभक्त धर्म संस्कृती परंपरा वगैरे गोष्टींना दुरून नमस्कार. त्यांच्या फँटसीपायी मी माझ्या आयुष्याची माती करू नये. शेवटी प्रत्येकाचा मार्ग कायम प्रत्येकाला शोधायचा असतो. सापडला तर चांगले म्हणावे नाही सापडला तर वाईट वाटून घेऊ नये. चांगभले म्हणून शोधत राहावे. ३. कुटुंब हेच भारतीय व्यक्तीच्या आयुष्याचे केंद्र असते. त्याविरुद्ध जास्त फाईट मारली तर सतत ताणात राहावे लागते. ज्यांना जमते त्यांनी खुशाल करावे. जमत नसेल तर स्वत: पासून स्वतःपुरती नवीन कौटुंबिक मूल्यव्यवस्था उभी करावी. ४. दहा भिकार कामचलावू गोष्टी घेण्यापेक्षा/करण्यापेक्षा तीन बेसिक पण अतिशय दर्जेदार गोष्टी घेतलेल्या/केलेल्या कधीही बऱ्या. जास्तीत जास्त वेळा enabler गोष्टी कराव्यात/घ्याव्यात. ५. delayed gratification वगैरे फिलॉसॉफी ठीक असली तरी नेहमीच स्वतःचे मन मारू नये. gratification का मिळते त्याच्या खोलात गेले की मुळात त्याची गरजच संपून जाते. ६. सौंदर्याचा ध्यास हरवू नये. स्वतःची सौंदर्यदृष्टी कायम घडवत राहावे. आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टी खूप कमी असतात त्यापैकी एक म्हणजे सौंदर्य आहे. त्यामुळे टेस्ट अधिकाधिक रिफाइन करत राहावे. ७. स्थैर्य ही खूप भ्रामक कल्पना आहे. त्याच्या मागे धावण्यात आयुष्य अस्थिर होते हा अंतर्गत पॅराडॉक्स आहे. त्यामुळे त्या विशियस सायकल मधून बाहेर पडणे चांगले. चढ उतार हा सगळ्याच गोष्टीचा मूलभूत नियम आहे. त्यामुळे दोघांचेही फाजील लाड/भांडवल करणे थांबवणे गरजचे. ८. राजकारण करण्यात मजा आहे. त्याची reactive चर्चा करण्यात काहीही हशील नाही. वेळेचा अपव्यय. शिवाय आपल्या पातळीवर जोवर discussion येत नाही तोवर आपल्याला त्यातून आनंद तर मिळणार नाहीच वरती नैराश्य येणार. ९. एकंदरीत चर्चा आणि वाट पाहणे यात आयुष्याचा महत्त्वाचा वेळ निघून जातो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी कमीत कमीत करणे चांगले. blocking गोष्टींसाठी मिळालेल्या resources चे optimum utilization हवे असेल तर async io ला पर्याय नाही. delayed gratification सुद्धा एक ब्लॉकिंग संकल्पना आहे. १०. (इतरांना शक्यतोवर कोणतीही इजा ना करता) स्वत:च्या आनंदाची निधाने गिल्टी ना होता शोधावीत. चांगुलपणाचे बुरखे पांघरू नयेत. बुरखे वाईट. ११. एका पॉईंट नंतर लोकांना एंटरटेन करत बसू नये. लोक हरामखोर देखील असतात हे विसरू नये. १२. दुःख झाले तर बळेच स्वतःस मोटीवेट करत बसू नये. भोगून मोकळे व्हावे. ते नैसर्गिक रित्या होतेच. कायम मोटिवेटेड राहणे चुतियाप्पा आहे. १३. जगात स्किल्ड माणसांची कायम गरज असते. त्यामुळे उजव्या-डाव्या-निर्बुद्धांची अशा कोणत्याही विचारसरणीची जरी सरशी झाली तरी फारसा लोड घेऊ नये. विचारसरणी कशीही असली तरी लोक स्किल्ड लोकांकडे झक मारत येतात. त्यामुळे स्किल्स विकसित करावेत. त्यासाठी स्वतःच्या क्षमतेचा पुरेसा अंदाज असावा. १४. मानत असलेल्या मूल्यांची कसोटी पाहणारे क्षण आयुष्यात खरेतर खूप कमी वेळा येतात. ते ज्या ठिकाणी नेहमी जाता येता येऊ लागतात ते ठिकाण तत्काळ सोडावे. एखाद्या ठिकाणी सडका उंदीर मरून पडला असेल तर नाक दाबून तिथेच बसून राहू नये अथवा तिथून दुसरीकडे जाण्याला पलायनवाद म्हणू नये. एखाद्या वेळेस तो एखादा अपवाद उंदीर उचलून दुसरीकडे टाकता येईल परंतु जिथे फक्त उंदरांचेच राज्य आहे तिथे मूलगामी बदल करायला आपण जिजस किंवा सिद्धार्थ म्हणून जन्माला आलेलो नाही त्याचे भान ठेवण्यात काही हरकत नाही. १५. शरीर सलामत तो आत्मे पचास. शरीराला जपून असावे. देशकालविपरीत गोष्टी करायला जाऊ नये. आहार निद्रा भय मैथुन यांची योग्य विल्हेवाट लावावी. एकंदरीत अतिरेक वाईट.
    9

© 2025 Indiareply.com. All rights reserved.

All Groups
    • Loading...
RECENT POSTS
Clear
    Loading...
New notification
Message icon
a few seconds ago

Sign in to our platform

Lost Password?
Not registered? Create account