Community Information
-
Waah Ustad!
https://preview.redd.it/h8lzqwb3xb7e1.png?width=1200&format=png&auto=webp&s=485d735aa7c6a4ed58e33d69b132580b7db150f5 जसराज पूर्वी तबला वाजवत असल्यामुळे असेल, पण त्यांची आणि झाकीर हुसेन यांची दोस्ती असावी. कारण IIT मध्ये असताना बरेचदा आम्ही संगितवेडे पीर पंडित जसराजांकडे जायचो तेव्हा तोही तिथे असायचा. मग खूप गप्पा रंगायच्या. (झाकीर माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान. म्हणजे त्यावेळी तो 19-20 वर्षांचा असावा.) झाकीर हुसेन हा इतका गोड आणि लोभस व्यक्तिमत्वाचा, विनयी आणि साधा होता की तो पटकन आमच्यात मिसळून जायचा. त्याला आता आठवणारही नाही पण एकदा तर मी आणि तो जसराजांकडून निघालो आणि खालीच असलेल्या इराण्याच्या हॉटेलमध्ये 'पानी कम चहा' पिऊन समुद्रावर फिरायलाही गेलो होतो ! (माझ्या मुसाफिर या आत्मचरित्रातून) मुसाफिरलाही आता 12-13 वर्ष होऊन गेली. त्यानंतर त्याचे अनेक कार्यक्रम मी ऐकले. तोच तो गोड चेहरा, उडणारी झुल्फे, समेवर आल्यावर लोकांचा टाळ्यांचा कडकडाट अजून कानात घुमतोय. त्याचा परफॉर्मन्स नुसता श्रवणीय नसायचा तर खूप देखणाही असायचा. त्याच्या कार्यक्रमांना आलेली तुडुंब गर्दी चक्क पागल झालेली मी पाहिली आहे.नंतरच्या काळात मी इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी मध्ये बरीच वर्ष काम केल्यावर पूर्णवेळ मराठीत लिखाण चालू केलं होतं. पण हे त्याला माहित असण्याचं कारणच नव्हतं. कारण तो त्याच्या दुनियेतला अनभिशिक्त बादशाह झाला होता ! त्याला सगळं जग ओळखत होतं ! पण तरीही एकदा मेहेफील झाल्यावर मी धैर्य एकवटून त्याला पूर्वीची आठवण करून दिली तेव्हा तर त्यानं प्रेमानं हात हातात घेतला आणि बराच वेळ सोडलाच नाही. तेव्हाचा त्याचा तोच निरागस चेहरा मला पुन्हा दिसला होता. नाहीतर कोण होतो मी त्याच्यापुढे !!! थोडंसं यश मिळाल्यावर खूप अरेरावीनं वागणारे मी अनेक बघितले आहेत. पण झाकीर त्यातला नव्हता. तो आता नाही यावर विश्वासही बसत नाहीये. आता फक्त आठवणीच ! आता मात्र आपलं आयुष्य पुन्हा समेवर येणं अवघडच !! अच्युत गोडबोले5
© 2025 Indiareply.com. All rights reserved.