Community Information
-
अती तिथे माती
गेला १-१.५ महिना ह्या सब वर लोकांनी २-३ विषयांवरून नुसता धुमाकूळ घातलाय १- शिवछत्रपती/ शंभूराजे आणि त्यांची महती आणि त्यांच्या कार्याबद्दल अमराठी लोकं काय म्हणतात. २- छावा चित्रपट आणि त्याचे review ३- मराठी विरुद्ध कानडी आणि बस incident ४- मराठा सामराज्य हे विषय महत्वाचे नाहीत अस माझं म्हणणं नाही. पण आता तेच तेच वाचून कंटाळा आला आणि असं नाही की आपल्याकडे बाकी विषय नाहीत. महाराष्ट्र आणि मराठी हे इतके वैविध्यपूर्ण विषय आहेत की त्यात कला, क्रीडा, इतिहास( शिवकाळ सोडून पण महाराष्ट्राला अत्यंत संपन्न इतिहास आहे), भूगोल, साहित्य, संगीत, काव्य,थोर व्यक्ती(अपेक्षित: पु ल देशपांडेंनी अखिल विश्व मराठी संमेलनात भाषण दिलेला तेव्हा मंचावर बसलेले सर्व), वनस्पती, प्राणी इ इ. असे अनेक विषय आहे चर्चा करण्यासारखे ( अजूनही असंख्य असतील, मला आत्ता एवढेच आठवतायत) चला ह्या गोष्टींवर चर्चा करू आणि तेच तेच चावून चोथा झालेले विषय मागे सोडू. जय महाराष्ट्र । जय शिवराय1
© 2025 Indiareply.com. All rights reserved.