Community Information
-
पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची २६४ वर्षे.
अवघ्या विशितल्या पोरांनी आपल्या घरापासून,आपल्या जन्मभूमीपासून शेकडो मैलांवर जाऊन या देशाचे तख्त राखण्यासाठी छेडलेला रणसंग्राम म्हणजे पानिपत. आपला भावी पेशवा, आपला पराक्रमी सेनापती आणि कैक साऱ्या महान योद्ध्यांची आहुती मराठ्यांनी या संग्रामात दिली. एका सावकाराने नानासाहेब पेशव्यांच्या समोर वर्णन केल्या प्रमाणे "दोन मोते गळली ,27 मोहरे हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेल्या यांची गणतीच नाही". संपूर्ण भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारं पानिपतचे तिसरे युद्ध, विजयी होऊन देखील अहमदशाह अब्दाली पुन्हा दिल्लीच्या वाटेला आला नाही, विश्वासराव आणि भाऊंच्या पराक्रमाची महती सांगणारा पत्र व्यवहार त्याने नानासाहेब पेशव्यांच्या बरोबर केला. या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम मराठी आणि भारतीय सैनिकांना आज त्यांच्या हौत्तत्म्या दिनी मनःपूर्वक वंदन.9
© 2025 Indiareply.com. All rights reserved.