IndiaReply Logo Indiareply
Sign In Sign Up
  • Home
  • Popular
  • Explore
  • All
    • Loading...

Tell us about your community

i/communityname

Your community description

Info
Install our Android app to unlock all features.
i/Maharashtra
Chat About

Community Information

i/maharashtra

  • sainsamridh_01

    •

    5 months

    हिरकणी आणि मी

    नुकताच बेंगलोर मधे आलेलो, ते आहे ना हायब्रिड वर्क मॉडेल त्यासाठीच, डिसेंबरचे शेवटचे दहा दिवस करायचे होते. मंगळवारी येऊन ईमेल बघितले तर काय कंपनीने २३ पासून घरातून काम करा अस जाहीर केल होत. मग आता इथे थांबून काय करायच त्यापेक्षा गप आपल्या घरी जायच म्हणून शनिवारचा दिवस ठरवला. शुक्रवारी आमची तयारी चालू केली. आता बेंगलोर ते कोल्हापूर विमान सेवा सुरू झाली आहे पण सध्या तरी तरी सामान्य माणसाला परवडत नाही मग रेल्वे हा उत्तम पर्याय वाटला पण तत्काळ तिकीट पण भेटले नाही. आता पर्याय होता खाजगी ट्रॅव्हल,जरा ऑनलाइन बुकिंग च ऍप चालू केल तर ३००० च्या खाली काय आकडा दिसणा. महिन्याचा शेवट आल्यामुळे खात्यामध्ये पण जास्त पैसे नव्हते आणि आहे तेवढ्यात अजून एक आठवडा तरी काढावा लागणार होता मग ३००० जास्तच होते आमच्यासाठी. शेवटचा पर्याय डोळ्यासमोर आला, महामंडळ; लगेच डोक्यात विचार आला एवढा वेळ बसून उद्या सकाळी कस होईल, होईल का? पण एकच पर्याय समोर असल्याने त्याचीच तयारी चालू केली. मुंबई ते बेंगलोर ही हिरकणी एसटी होती आमच्यासाठी. सुरुवात झाली ती एसटी बेंगलोर ला आली आहे का? कधी कधी ही एसटी येत नाही एस ऐकल हो, आता हे माहिती करून घेण्यासाठी आम्ही रात्री ७ वाजल्यापासून कोल्हापूर डेपो मधे फोन लावयला चालू केल कारण जर शुक्रवारी रात्री ती कोल्हापूर हून बेंगलोर ला निघाली असली तरच शनिवारी इथून परत जाणार. जवळ जवळ २५-३० वेळा फोन लावला असेल त्यातील ५-६ वेळा रिंगा ऐकू आल्या आणि इतर वेळी बिजी आहे अस सांगत होती एक बाई. मग मित्राने सरळ मुंबई डेपो मधे फोन करून खात्री केली की एसटी मुंबई हून निघाली आहे, मग आमच्या एसटीच्या प्रवासावर शिक्कामोर्तब झाला. आज आहे प्रवासाचा दिवस, एसटी ४ किंवा ४:३० ला निघते बेंगलोर मधून एवढ माहीत होत. मग आम्ही २ वाजताच आमच्या खोली मधून बाहेर पडलो,जी बेंगलोर च्या बस स्थानकापासून २० किमी दूर आहे. तिथून लोकल बस पकडून २५ रुपया मधे स्टँड ला आलो. आता तिथल स्टँड म्हणजे आपली ४-५ सीबीएस बसतील. महामंडळ कुठे लागते शोधायला चालू केल, ४ वाजायला १० मिनिट कमी होती आणि समोर MH१२ अस दिसल्या दिसल्या “भावा जिंकलो आपण” अस म्हणत एसटी कडे गेलो आणि हातातून आणलेली कापडी पिशवी ठेवून जागा धरून ठेवली. जरा एसटी च्या बाहेर येऊन थांबलो तिथे एक दादा होता. तस मला लोकांशी बोलायचं तर असत पण सुरुवात कशी करायची इथच कायम अडून जायाच आणि बोलण राहायच. पण जरा थांबून त्याला विचारलंच ‘मराठी आहे काय दादा’? मग झालं चालू पुढे त्यांच्याकडून समजलं एसटी ४:३० ला निघणार आहे. दादा होते रत्नागिरीचे पण बालपणापासून बेंगलोर मधे तरी सुद्धा रत्नागिरीची बोली होती तशीच. थोडी बोर आणि चिप्स घेतली आणि आत जाऊन बसलो. ४-५ जण तरी होतीत तेवढ्यात एक फॅमिली आली त्यांचीच ७ जण आलीत, सेम आमच्या सारखीच परिस्थिती म्हणून महामंडळ कडे आगेकूच केली होती. ४:३० म्हणत ४:४५ ला गाडी स्थानकातून बाहेर पडली. आता सगळ्या प्रवासात पण खूप काही सांगण्यासारखं आहे. कोण दर ५ मिनिटाला बडका टाकत होता खिडकीतून बाहेर, कोण म्हणे तिकीट एवढच आहे आणि एवढ जास्त पैसे कसले, रस्त्यामध्ये एक भिषण अपघात झाला होता (आजच्या पेपर मधे वाचलेच असेल), रात्री जेवायला थांबली तिथल्या काही गोष्टी. चित्रदुर्गा, दावनगिरी, हवेली, हुबळी ही रात्रीची स्थानके. चालक आणि वाहकाची बदली, बदलून आलेल्या वाहकाची चिडचीड, पहाटेच्या धुक्यातून पुढे येताना. लय काय काय आहे पण मी कधी एवढ लिहीत नाही आणि पहिल्यांदाच अस कथा लिहायचा प्रयत्न केला आहे. जर का तुम्ही इथपर्यंत वाचत आला असाल किंवा थेट शेवटच कडव वाचत असाल तर नक्की सांगा मला लिहायला जमतय का नाही. शेवटी कशी जरी असली तरी हिरकणी नेच घरापर्यंत आणल आणि तेही १०४५ रुपये मधे.
    15

© 2025 Indiareply.com. All rights reserved.

All Groups
    • Loading...
RECENT POSTS
Clear
    Loading...
New notification
Message icon
a few seconds ago

Sign in to our platform

Lost Password?
Not registered? Create account