Community Information
-
MSEB कडून rooftop solar लावणाऱ्या घरांची फसवणूक....
सध्या ची यंत्रणा - सोलर सिस्टीम बसवलेल्या ग्राहकांच्या घरात दिवसभर जेवढे युनिट वीज सूर्यप्रकाशामुळे तयार होईल ती त्यांनी महावितरणच्या ग्रीडमध्ये टाकायची आणि ग्राहक दिवसरात्र मिळून जेवढे युनिट वीज वापरेल ती तयार केलेल्या युनिटमधून वजा करुन फक्त उर्वरीत युनिट चे पैसे भरायचे. जर तयार केलेली वीज वापरलेल्या वीजेपेक्षा जास्त असेल तर तेवढे युनिट ग्राहकाच्या खात्यात जमा राहतील व ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत त्या युनिटसचा वापर तो करु शकेल व वर्षाअखेर जे युनिट्स त्यांच्या खात्यात जास्तीचे शिल्लक राहतील त्यांचे महावितरण ग्राहकाला पैसे देईल. ही यंत्रणा सुरळीत राबवण्यासाठी नेट मीटर बसवण्यात येतात. आजवर घरगुती ग्राहकांना हे मीटर्स स्मार्ट मिटर नव्हते. मात्र आता महावितरणच सर्व ग्राहकांना स्मार्ट नेट मीटर बसवणार आहे जे TOD meters असणार आहेत. रुफटाॅप रेग्युलेशन्स २०१९ च्या 11.4 ( d) प्रमाणे TOD net meters असलेल्या ग्राहकांना दिवसाच्या ज्या काळात ( म्हणजे सकाळी ९ ते संध्याकाळी ५) सोलर सिस्टीम मधून वीज तयार केली गेली असेल त्याच काळात वापरलेल्या युनिट्स बरोबर वजाबाकी होईल आणि या काळात जी जास्तीची वीज तयार होईल ती off peak काळात तयार झालेली वीज म्हणून धरली जाईल. व अर्थातच peak hours मध्ये त्याचा setoff मिळणार नाही. मुळातच सोलर मधून वीज फक्त दिवसा ९ ते ५ या वेळेतच तयार होते तर घरगुती ग्राहकांचा वीजवापर प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत असतो. त्यामुळे त्याला आता या TOD meters मुळे set off मिळणार नाही. आत्ता महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीजदरवाढ प्रस्तावात off peak hours म्हणून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ ही वेळ ठरवली आहे. त्यामुळे या काळातच तयार झालेली सोलर वीज त्याच काळात वापरली नाही तर ती फक्त खात्यात दिसत राहील व वर्षाचे शेवटी तेवढ्या युनिट्स च्या ८८% युनिट्स चे ३ / ३.५० रुपयांप्रमाणे पैसे मिळतील. आणि ग्राहक संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या मुख्य वेळेत जी वीज वापरेल त्याचे त्याला रेग्युलर रेट प्रमाणे बिल भरावेच लागेल आणि सोलर सिस्टीम बसवल्यामुळे वीजबिल शून्यावर येण्याचे त्याचे स्वप्न भंग पावेल.3
© 2025 Indiareply.com. All rights reserved.