Community Information
-
या वर्षी वाचलेली मराठी पुस्तके आणि त्यांचा थोडक्यात अभिप्राय !
तुंबाडचे खोत: कोकणातील एका घराण्याची ४ पिढ्यांचे कथानक आहे. ‘storyline’ साधी सरळ आहे एखाद्या हिंदी चित्रपटा सारखी. पण, लेखकाने ‘characterization’ उत्तम केले आहे. या गोष्टीतील पात्र सैद्यव तुमच्या सोबत राहतील. [Must Read!] इंदिरा: मूळ इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर असल्यामुळे, चरित्रात असतो तो ‘flow’ जाणवत नाही. दुर्गभ्रमण गाथा: “गोनीदा म्हणजे किल्ले जगलेला माणूस” हे खरोखर जाणवते. हे पुस्तक तुम्हाला अक्षरशः किल्ल्यावर नेते आणि असे वाटते तुम्ही स्वतः गोनीदा बरोबर फिरत आहात. [Must Read!] कोळवाडा : आदिवासी कोळी जमाती ची जीवनपद्धती लेखकाने स्वतः अनुभवलेला किस्स्या मधून सांगितली आहे. माहितीपर पुस्तक म्हणून वाचावे. वपुर्झा: पहिल्यांदा वाचले. अतिशय सुंदर लिखान. काही किस्से/ अनुभव पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटणारे. अमृतवेल: खांडेकर = शब्दांचे जादूगार. ४-५ वेळा वाचले हे पुस्तक. नेहमीच सुखद अनुभव आणि जीवना कडे बघण्याचा positive दृष्टिकोन देते. युगंधर, मृत्युंजय बद्दल काही लिहावे एवढी माझी पात्रता नाही. तुम्हाला मराठी वाचता येत असेल, तर सर्वप्रथम ह्या दोन कादंबऱ्या वाचा. मृत्युंजय आयुष्या च्या वेगवेगळ्या टप्प्यांवरून वेगवेगळे वाटते. ही कादंबरी वाचल्यानंतर midlife crisis मधे असणाऱ्या प्रत्येकाला ‘कर्ण’ आपलासा वाटतो.13
© 2025 Indiareply.com. All rights reserved.