Community Information
-
महाराष्ट्रात वनमंत्री काय करत आहेत ?
१० दिवसात ८ वाघांचा मृत्यू, २ बेपत्ता.. वनमंत्री कुठेयत? २ जानेवारी : चंद्रपूर सिंदेवाही वन परिक्षेत्रात शेतातील नाल्याजवळ वाघाचा मृतदेह आढळला. ६ जानेवारी : भंडारा-तुमसर वन परिक्षेत्राअंतर्गत घनदाट जंगलात वाघाचा मृतदेह आढळला. वाघीणीचे ४ तुकडे करुन फेकले. ६ जानेवारी : नागपूरच्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात ३ वाघांचा संसर्गाने मृत्यू. ७ जानेवारी : यवतमाळ वणी तालुक्यातील उकणी येथील कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. ८ जानेवारी : नागपूर पेंच व्याघ्र प्रकल्पालगत वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. ९ जानेवारी : चंद्रपूर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मूल बफर क्षेत्रात वाघिणीच्या पाच ते सहा महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह आढळला. तर अजून २ वाघ बेपत्ता आहे. वाघांच्या मृत्युच्या इतक्या भीषण घटना काही दिवसातच महाराष्ट्रात घडल्या. पण दुर्दैवाने कोणालाच याचं सोयरसुतक नाही..टोकाच्या गंभीर घटना घडून सुद्धा वनमंत्री अजून पुढे येऊन बोलले सुद्धा नाहीयेत. आयुष्यभर काँक्रीटच्या जंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीला विदर्भातलं जंगल कितपत समजणार हा विचार न करता वनमंत्री करण्यात आलं. ज्या नवी मुंबईत जंगलांचा ज पण शिल्लक ठेवला नाही तिथल्या लोकप्रतिनिधीला वनमंत्री करुन काय साध्य होणार. मुळात जंगल, वन्यप्राणी, तिथले प्रश्न , मुद्दे यांना समजणार तरी आहेत का? समजून घेतले असते तर परिस्थितीचं गांभिर्य कळून लगेच त्यावर अॅक्ट झाले असते, बोलले असते... राज्याच्या जंगल बहुल भागातला एकही आमदार वनमंत्री होण्यासाठी पात्र नव्हता का? असं सुरु राहीलं तर महाराष्ट्रातले वाघ नामशेष होतील. स्त्रोत : https://www.saamana.com/two-more-tigers-missing-from-tipeshwar-wildlife-sanctuary-five-tigers-killed-in-state-in-ten-days/ https://wanibahuguni.com/waninews/ukni-tiger-dies-of-electric-shock/ https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/nagpur/death-of-a-tiger-in-the-shade-forest-area-chandrapur-rsj-74-amy-95-4120330/lite/13
© 2025 Indiareply.com. All rights reserved.