Community Information
-
या सबवर (फक्त) मराठीमध्ये का नाही बोलत?
हा विषय पुन्हा पुन्हा येत असेल तर सुरुवातीलाच माफी मागतो.पण गेले अनेक दिवस इथे पाहतो आहे की मराठी माणसे इंग्रजीत लिहीत आहेत. देवनागरीमध्ये लिहायला अवघड जात असेल तर एकवेळ रोमन इंग्रजीमध्ये लिहा. पण संभाषण तर मराठीमध्ये व्हायला पाहिजे मित्रा-मैत्रिणींनो. अनेक अमराठी लोक इथे वास्तव्य करतात हे खरंय, त्यांना बोलू दे इंग्रजीत. पुन्हा एकदा माफी मागतो कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर पण ही अपेक्षा रास्त आहे असं वाटतं.परदेशी जाताना आपण तिथली भाषा शिकतो. इंग्रजी, जर्मन, फ्रेंच इत्यादी. मग महाराष्ट्रात राहून…?5
© 2025 Indiareply.com. All rights reserved.