Community Information
-
छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कसं मारलं...??? जे सिनेमात नाही दाखवलं.....
सर्वात आधी संभाजी महाराजांना इराणमध्ये गुन्हेगारांचा पोषाख असतो तसं तख्ता कुलाह घालण्यात आला. म्हणजे विदुषकासारखा रंगीबेरंगी झब्बा आणि डोक्यावर लाकडी टोपी. मानेवर जड लाकडी खोडा ज्याचा मानेवर प्रचंड भार होता. त्याला हात बांधले. याच खोड्याला घुंगरु सुद्धा बांधले होते. जाड लोखंडी साखळदांड हातात आणि अंगात घातले गेले. त्यानंतर प्रत्येक क्षणाला महाराज आणि कलशाला यातना दिल्या गेल्या. आसपासचे लोक सुद्धा त्यांना वेदना देत होते.त्यानंतर महाराजांची उंटावरुन धिंड काढण्यात आली. सोबत ढोल- नगारे वाजवले जात होते. वेगवेगळ्या तऱ्हेने पीडा देऊन विटंबना केली जात होती. दरबारात पेश केलं तेव्हा संभाजी महाराज रक्ताने माखलेले होते. एवढया वेदना देऊनसुद्धा संभाजी राजांनी औरंगजेबापुढे मान लवली नाही. त्याच रात्री संभाजी महाराजांचे डोळ्यांमध्ये गरम सळई टाकून डोळे फोडण्यात आले. महाराजांचे हात छाटण्यात आले. कवि कलशाची जीभ उपटण्यात आली. त्यानंतर स्वाभिमानी संभाजी राजांनी अन्नत्याग केला. डोळे फुटलेल्या अवस्थेत पुढचे १५ ते २० दिवस संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यांची कातडी सोलण्यात आली. त्यानंतर संभाजी महाराजांचं मुंडक तलवारीने छाटण्यात आलं. संभाजी महाराजांचं शिर वेगळं केल्यावर त्यात भुसा भरुन, भाल्यावर खोचत ते शहरात जागोजागी फिरवण्यात आलं. मग त्यांचा छिन्नविछिन्न देह वढू गावात फेकून देण्यात आला. जगाच्या इतिहासात एखाद्या पर्वतासारखा छातीवर वार झेलत मृत्युला स्वाभिमानाने कवटाळणारा राजा झाला नसेल... काळजाचा थरकाप उडवणाऱ्या यातना देऊनही या राजाने मरण पत्करलं पण औरंग्यापुढे मान सुद्धा तुकवली नाही... गुडघे तर दुरच.... आपला इतिहास याच विरांच्या रक्ताने माखलेला आहे.... > Source : Books From https://chatrapatisevapratishthan.org/sale-of-books/4
© 2025 Indiareply.com. All rights reserved.