Community Information
-
•
पुरे झाली रडारड! आता तरी भविष्या कडे बघा!
पुरे झाली रडारड. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आपल्या देशात छ. संभाजी महाराज आणि मराठे, यांच्या इतिहासाबद्दल बरीच चर्चा होत आहे. जो तो आपलं मत देऊन जातो आणि आपण सगळे आपल्या प्रतिक्रिया द्यायला अगदी टिपूनच बसलो असतो. r/Maharashtra वर देखील सारखी हीच चर्चा सुरू आहे. आपण सारखं इतिहासातच गुंतून राहतो आणि त्याबद्दल फारच भावनात्मक असतो : कधी छ. संभाजी महाराज आणि कधी सावरकर. इतिहासाचा अभ्यास, इतिहासाचे निरीक्षण करणे चूक नाही. ते आपण करायलाच पाहिजे आणि त्यातून नक्कीच शिकवण घ्यायला पाहिजे. पण त्यात इतकं गुंतून राहणं चांगलं नाही. आपले राजकारणी मराठी माणसाला यातच गुंतवून ठेवतात आणि आपले लक्ष सद्य मुद्द्यान कडून वेधतात. आपण या असल्या डावपेचांपासून दूर राहिले पाहिजे. आपलं लक्ष आपल्या सद्यस्थिती आणि आपल्या भविष्याकडे असायला हवं. मराठी माणसाला प्रगती करायची असेल, तर त्याला इतिहासाच्या गुंत्यांतून मोकळं व्हावं लागेल. पुढे बघा, प्रगती करा, innovate करा, संशोधन करा, उद्योग धंदे करा, साहित्य लिहा, कलाकृती बनवा, काहीही करा पण पुढे चालत रहा. सर्व सामाजिक माध्यमांवर इतिहासाबद्दल रडारड करून, कोणी कोणाबद्दल काय म्हटलं यावर रडारड करून काहीच साध्य होणार नाही. जय महाराष्ट्र !5
© 2025 Indiareply.com. All rights reserved.