Community Information
-
जुनी कादंबरी वा कथासंग्रह शोधण्यास मदत हवीय!
लहानपणी वाचलेली एक कादंबरी/कथासंग्रह शोधत आहे, पण तिचं नाव काही आठवत नाही. कथेतल्या काही गोष्टी आठवतात ज्या कदाचित कुणासाठी चमकतील: १. कथेचं नाव एक तर सर्पाशी निगडित आहे किंवा मोठ्या वाड्याशी. २. कथा एका वाड्यातल्या तळघरात ठेवलेल्या गुप्तधनाभोवती फिरते, एक भुजंग त्या खजिन्याची रखवाली करत असतो बहुतेक. जो कुणी तळघराजवळ जाईल, त्याला भुजंगाचं डोकं दाराशी दिसत असतं असं काहीसं आठवतंय. ३. पात्रांमध्ये गावातलं बडं धेंड (पाटील बहुतेक), त्याच्या घरातली कुणी एक तरुणी, तीने मनोमन वरलेला पुरुष, पाटलानं सुरक्षेसाठी ठेवलेले काही रामोशी, आणि पाटलाच्या भावकीतलाच असलेल्या खलनायकाचा समावेश आहे. ह्या व्यतिरिक्त काहीच आठवत नाही, पण ती कादंबरी पुन्हा वाचण्याची नक्कीच इच्छा आहे. मी जी प्रत वाचली होती ती पुणे विद्यापीठाच्या वाचनालयातली प्रत होती, पण पिवळी पडलेली, तेव्हा नक्कीच ८०-९० च्या दशकातली आहे. जर इथे कुणी रसिक, किंवा कुणाचे नातेवाईक तेव्हाचे वाचक असतील, त्यांनी कृपया किमान नाव शोधण्यास मदत करावी.2
© 2025 Indiareply.com. All rights reserved.