Community Information
-
अगरबत्तीच्या वासाचा त्रास
अपार्टमेंटमध्ये राहायचे काही विचित्र तोटे आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आमचे शेजारी कसली तरी अगरबत्ती लावत आहेत. एका बाजूचे सकाळी लावतात तर दुसरे संध्याकाळी दिवेलागणीलाच्या वेळेला लावतात. पण दोन्ही अगरबत्त्या सेम आहेत. आधीच्या काळी अगरबत्याचा वास छान असायचा. पण आत्ताच्या अगरबत्त्या कदाचित खूप केमिकल युक्त आहेत असे वाटते. कारण त्याचा वास खूप उग्र आणि असह्य आहे. दोन मिनिटात डोके दुखायला लागते. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना विनंती केली की साध्या उदबत्या वापरा म्हणून. पण ते ऐकत नाहीत. उलट त्यांच्या बाल्कनीमध्ये भसाभसा लावतात. त्यामुळे सगळा वास इतरांच्या घरात जातो. हा वास जवळजवळ तासभर राहतो. दारे खिडक्या बंद केल्या तरी कुठून तरी शिरकाव होतोच. मूर्ख लोक. असा कुठला रिसर्च पेपर वगैरे आहे का की जेणेकरून त्यांना सांगता येईल की हे वास आरोग्यासाठी घातक आहेत म्हणून? दोघांकडे लहान मुले आणि सिनियर सिटिझन आहेत.16
© 2025 Indiareply.com. All rights reserved.